?
Ask Question
Neonatologist in Sangli , Dr. Amit Tagare would like to share a proud moment 

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली  सेव्ह सॉईल (माती वाचावा) मोहिमेच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. माती वाचावा मोहिमेचे उद्घाटन save soil चा बॅच लावून करण्यात आले. माती वाचविणे हि आताच्या घडीला खूप गरज आहे. माती कशी वाचवता येईल, कशी टिकवता येईल तसेच त्या मातीचे घटक कसे वाढवता येतील याची संकल्पना डॉ अमित तगारे आणि  डॉ मुग्धा तगारे यांनी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून दाखविले. माती वाचविण्यासाठी भरपूर प्रमाणात झाडे लावली गेली पाहिजेत यामुळे मनपा क्षेत्रात तसेच इतर मोकळे प्लॉट असतील तिथे झाडे लावण्यात यावीत असे यावेळी नागरिकांना अवाहन  करण्यात आले. पर्यावरणातील बदलामुळे मातीचा कस आणि त्यातील घटक कमी होत चालले आहेत आणि हे टिकविण्यासाठी माती वाचवा मोहिमेत शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, NGO, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक यांचा  सहभाग घेतला जाणार असून महापालिका क्षेत्रात माती वाचवा चळवळ आणि वृक्ष लागवडीवर अधिक भर देणार असल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. 

0ddefe17a3a34f0f48b742d44b211fb45d2ef14562ab287122876.jpeg?size=500&type=posts

ed46b4395784eb38939336dc726ce19e4598a28c62ab28701ba02.jpeg?size=500&type=posts

Consult Our Expert!
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer